Pune News : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घ्या : चित्रा वाघ

एमपीसी न्यूज : कुटुंबीयांकडून लेखी तक्रार नसल्यामुळे पुणे पोलिसांनी एफआयआर दाखल केली नाही. हे संशयास्पद आहे त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून तपास काढून घ्यावा, अशी मागणी भाजप महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांची भेट घेतली. त्यानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, पूजा चव्हाण हिने काही दिवसांपूर्वी वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये महाआघाडीतील एका मंत्र्याचे नाव जोडले गेले आहे. दोघांचे संबंध स्पष्ट करणारे ऑडीओ क्लीप्स जाहीर झाल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

तरी काहीच कारवाई न करता पोलिस हातावर हात ठेवून बसले आहेत. पुणे पोलिसांवर सरकारचा दबाव टाकला जात आहे. महाराष्ट्र जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केली आहे.

पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पुजा मृत्यू प्रकरणी प्रत्यक्षदर्शींना सोडून दिले. एफआयर दाखल केलेली नाही. त्यामुळे पुणे पोलिसांकडून तपास काढून घेतला पाहिजे. महाराष्ट्रातील एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला हा तपास द्या. आता मुख्यमंत्र्यानीच पुणे पोलिसांना विचारावं की, ते कोणाच्या आदेशाची वाट पाहतायेत, अशा शब्दात त्यांनी पुणे पोलिसांच्या दिरंगाईवर टीका केली.

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोग, राज्याचे पोलीस महासंचालकांना दिलेला चौकशी अहवाल हा वनमंत्री संजय राठोडच्या चौकशीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हा अपूर्ण अहवाल सादर करुन पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना टोपी घालण्याचे काम केले आहे. सत्तेत असणारे तिन्ही पक्ष बलात्कारी व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा पायंडा महाराष्ट्रसाठी घातक आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.