Pune News : पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी !

एमपीसी न्यूज : कोरोना संक्रमणानंतर पुणे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यात भर म्हणजे पाणीपट्टी पोटी पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंटकडे तब्बल 72 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांना तातडीने थकबाकी जमा करा, अशा सूचना पुणे महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.

महापालिकेकडून शहरातील नागरिकांसह विविध केंद्र, राज्य शासकीय कार्यालयांनाही पाणी पुरवठा केला जातो. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डालाही महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही बोर्डांच्या थकबाकीत गेल्या अनेक वर्षांपासून बरीच वाढ झाली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंटकडून जवळपास 36 कोटी तर खडकी कॅन्टोन्मेंटसाठी 36 कोटी रुपये बाकी आहेत. यामध्ये बोर्डांच्या मुख्य कार्यालयासह छावणी परिसरातील निवासस्थाने, बाजारपेठा, व्यापारी गाळेधारकांसह हॉटेल व्यावसायिकांची देखीलथकबाकी आहे.

दरम्यान, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी भामा-आसखेड ते खडकी कॅम्पसला पाणी देण्याची मागणी केली आहे. एकीकडे जिथे थकबाकीदार पाण्याचे कोट्यवधी रुपयांचे बिल प्राप्त होत नाही, तेथे दुसरीकडे जास्त पाणी देण्याची मागणी होत असल्याचे चित्र धक्कादायक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.