Pune News : शिवरायांच्या अपमानाच्या निषेधार्थ 13 डिसेंबरला पुणे बंद, मुस्लिम संघटनांचाही पाठिंबा

एमपीसी न्यूज : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी (Pune News) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी संघटनांनी आंदोलने केली. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात बाल विकास आघाडीसह विविध संघटनेच्या प्रतिनिधीची एक बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारंवार होणाऱ्या अपमानाच्या निषेधार्थ येत्या 13 डिसेंबर रोजी पुणे शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

भगतसिंग कोषारी यांच्याकडून वारंवार शिवरायांचा अपमान करण्यात आला. कोशारी यांनी हे विधान करून एक महिन्याचा कालावधी लोटला तरी अजूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेतृत्व भगतसिंग कोशारी यांना पाठीशी तर घालत नाही ना असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. याचाच निषेध करण्यासाठी 13 डिसेंबर रोजी पुणे शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

या पुणे शहर बंद मध्ये मुस्लिम संघटनांनी ही पुढाकार (Pune News) घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में हर मुस्लिम मैदान मे अशी घोषणा देत पुण्यातील तीनशे मशिदीमधून पुणे बंद साठी आवाहन करणार असल्याची माहिती मुस्लिम मुलनिवासी मंचचे अंजुम इनामदार यांनी दिली.

Today’s Horoscope 08 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.