Pune News : पुण्यातील घरफोडीचे सत्र थांबेना, विश्रामबाग येथील घरफोडीत दीड लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – पुण्यातील घरफोडीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज होणाऱ्या घरफोड्या रोखण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे. मंगळवारी (दि.22) विश्रामबाग येथे झालेल्या घरफोडीत चोरांनी 1.46 लाखांचे दागिने लंपास केले आहेत.

याप्रकरणी संज्योत कोंढरे (वय 35, रा. राजेंद्रनगर, पुणे ) विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोंढरे यांच्या पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर येथील राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटे घरात घुसले. चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटातील 1 लाख 46 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.