-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News: पुणे पदवीधर भाजपची उमेदवारी संग्राम देशमुख यांना जाहीर

महाविकास आघाडीकडून कोण?

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेली पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. गुरुवारी (दि. 12) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 1 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सलग दोनवेळा पुणे पदवीधरचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे यावेळीही मतदारसंघ ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची कसोटी लागणार आहे.

भाजपने सांगलीतील संग्राम देशमुख यांना पुणे पदवीधरची उमेदवारी दिली आहे. संग्राम देशमुख सांगली भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा सातारा जिल्ह्यात साखर कारखाना आहे. दरम्यान, मनसेने रुपाली पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

तर, राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नाही. पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादी लढणार असल्याचे सांगितले जाते. पण, उमेदवार कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.