Pune News : पाच नोव्हेंबरपासून पुणे – इंदूर थेट विमान सेवा

एमपीसी न्यूज – पाच नोव्हेंबर पासून पुणे – इंदूर थेट विमान सेवा सुरु होणार आहे. शनिवार वगळता इतर सर्व दिवशी हि सेवा सुरू राहणार असल्याची माहिती इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळाच्या संचालक आर्यमा सान्याल यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून हि फ्लाईट दुपारी 12.30 ला उड्डाण भरेल तर दुपारी 1.45 ला ती इंदूर येथे पोहोचेल. तर, इंदूर येथून दुपारी 2.15 हि फ्लाईट उड्डाण केल्यानंतर दुपारी 3.30 वाजता ती पुण्यात पोहचेल. 27 मार्च 2021 पर्यंत हि सेवा सुरु राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.