Pune News : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चार मार्चपासून-जब्बार पटेल

एमपीसी न्यूज – 19 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज (बुधवारी) तारीख जाहीर करण्यात आली. चार मार्चपासून या महोत्सवाला सुरूवात होणार आहे. कोरोना काळात काम करणा-या फ्रंटलाईन वॉरिअर्सला हा महोत्सव समर्पित असणार आहे.

महोत्सवाचे संयोजक, दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी आज प्रत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कला दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

पटेल म्हणाले, चार ते 11 मार्च दरम्यान हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे जानेवारीत होणारा महोत्सव पुढे ढकलण्यात आला होता. महोत्सवात ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

महोत्सवासाठी यावर्षी 93 देशांमधून तब्बल 1,611 चित्रपट प्राप्त झाले आहेत. या मध्ये विविध विभागातील तब्बल 180 चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांना महोत्सवादरम्यान घेता येणार आहे. चित्रपट निवड समितीच्या माध्यमातून या चित्रपटांची निवड करण्यात आली असल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1