Pune News :जंबो हॉस्पिटलमध्ये पंपिंग सिस्टमच्या वापरामुळे मुसळधार पावसातही पाणी तुंबले नाही

0

एमपीसी न्यूज : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील (सीओईपी) जंबो हॉस्पिटलमध्ये पंपिंग सिस्टमच्या वापरामुळे मुसळधार पावसातही पाणी तुंबले नाही. ऑगस्टमध्ये रुग्णालयाचे बांधकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अडथळा निर्माण झाला होता. त्या काळात मुसळधार पावसामुळे हे रुग्णालय पूर्ण होण्यास विलंब झाला.

“रुग्णालयाच्या आवारात चार वॉटर पंपिंग सिस्टम बसविण्यात आली आहेत. त्यांनी पाणी खेचून नाल्यांमध्ये सोडले. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात पाणी साचले आहे,” असे समन्वयक असलेले पीएमसीचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
मुठे म्हणाले की, रुग्णालयाचे छप्पर हे मुसळधार पावसातही टिकणारे आहे. पाणी न साठता छप्परांवरुन खाली येते, त्यामुळे पावसाच्या पाण्याची गळती झाली नाही.

“दोन ठिकाणी फक्त लहान गळती दिसून आली. प्रमाण खूपच कमी होते. तेथून पाण्याची गळती बादल्यांमध्ये गोळा केली जात होती आणि नाल्यांमध्ये त्याची विल्हेवाट लावली जात होती. त्यामुळे रूग्णालयात देण्यात येणार्या सुविधा किंवा सेवेला बाधा येत नव्हती.”
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारांसाठी पीएमसीने रुग्णालय तयार केले आहे. संसर्गग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडसारख्या सुविधा येथे बसविण्यात आल्या आहेत. ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते.येथे ४०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. या रुग्णालयात सध्या सुमारे २०० रुग्णांवर उपचार सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.