Pune News: सात महिन्यानंतर धावली पुणे-लोणावळा लोकल

एमपीसी न्यूज – कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर पुणे-लोणावळा लोकल सेवा मार्च महिन्यापासून बंद होती. राज्यात अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुंबईतील लोकल काही दिवसांपूर्वी धावू लागली होती. आज पुणे लोणावळा लोकल सेवाही सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी आठ वाजता पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने ही लोकल रवाना झाली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही लोकलसेवा सुरू असणार आहे.

आज पासून पुढे आणि लोणावळ्यातून सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी एक लोकल सुटणार आहे. ही लोकल यादरम्यान च्या प्रत्येक स्थानकावर थांबेल. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाच या लोकलमधून प्रवास करता येणार आहे.

या लोकलमधून प्रवास करण्याआधी पोलिसांनी दिलेला क्यूआर कोड दाखवणे बंधनकारक असणार आहे. कारण ई पास दाखवल्या नंतरच प्रवाशांना तिकीट मिळणार आहे.

मोबाईल किंवा स्थानकावरील मशिनद्वारे तिकिटाची व्यवस्था बंद असल्यामुळे प्रवाशांना प्रत्येक रेल्वे स्थानकावर तिकीट घ्यावे लागणार आहे.

यापूर्वी मोबाईल द्वारे आणि स्थानकावरील मशिनद्वारे तिकीट घेणे शक्य होते. परंतु लॉकडाउन नंतर आलेल्या निर्बंधामुळे ही सुविधा अजूनही बंद आहे. त्यामुळे आता रेल्वेस्थानकावरील तिकीट खिडकीवर तिकीट मिळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.