Pune News : पुणे मेट्रोचा विस्तार आता आणखी दोन स्थानकांपर्यंत

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचा विस्तार आता आणखी दोन स्थानकांपर्यंत (Pune News) होणार आहे.आज दुपारी चार वाजता सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक दरम्यान मेट्रोची चाचणी होणार आहे.यात मंगळवार पेठ स्थानक व पुणे स्थानक असे दोन स्थानक असून, त्यावर मेट्रोची धाव होणार आहे.

 

Pimpri News : मराठवाडा जनविकास संघाचा शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारा’ने गौरव 

यानंतर आठ ते दहा दिवसांत वनाज ते रूबी हॉल मार्गिकेचे ‘सीएमआरएस’चे निरीक्षण होईल.रेल्वे सुरक्षा आयुक्त हे ही चाचणी करतील.
त्यानंतरच हा सेक्शन प्रवाशांच्या सेवेत खुला होईल.त्यामुळे वनाज ते गरवारे स्थानक सुरु असलेला (Pune News) मेट्रोचा विस्तार रुबी हॉलपर्यंत होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.