Pune News – ‘पुणे मिलेट’ महोत्सव उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – इस्कॉन एनव्हीसीसी पुणे, बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे (Pune News) आणि महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागातर्फे पुणे मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. हा महोत्सव कात्रज कोंढवा रोड येथील इस्कॉन – एनव्हीसीसी यांच्या परिसरात झाला. आपल्या आहारातील पोषणधान्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

Pune Rain : पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात

गोवर्धन ग्रामीण विकास संचालक सनतकुमार दास, कृषी संचालक दिलीप झेंडे, कृषी संचालक विकास पाटील आणि बायफचे कार्यक्रम संचालक प्रमोद ताकवले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाची सुरुवात झाली. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर आणि कृषी विभागाचे सहसंचालक सुनील बोरकर या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते मिलेट लंच! ज्यामध्ये विविध प्रकारच्या (Pune News) पोषणधान्यपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश होता, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. मेघना शुक्ला यांनी पोषणधान्य शिजवण्याचे प्रात्यक्षिक दिले. भात, पुलाव, चाट, पकोडा, कटलेट, दही बडा, चिल्ला, रोटी, थालीपीठ, पुरी, हलवा, पुडिंग, खीर, पॅनकेक आणि मिलेटचे विविध प्रकार यासह विविध पाककृती शिकवल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.