Pune News : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी पुणे महापालिकेची सुधारित नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे.

पुणे महापालिका क्षेत्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेच 6 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिवंध केला असून जमावबंदी लागू करण्यात येत आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते सकाळी 7 या कालावधीत तसेच शुक्रवारी संध्याकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शहरातील सर्व उद्याने, सार्वजनिक मैदाने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. तसेच शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत संपूर्णतः बंद राहील.

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने मार्केट व मॉल संपूर्णतः बंद राहतील.

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालय सर्व कार्यालयं बंद राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यात येणार आहे.

तसेच मनोरंजन व करमणूक संबंधित सिनेमागृह , नाट्यगृह, मनोरंजन पार्क, वॉटरपार्क, व्यायामशाळा, स्विमिंगपूल, क्रीडा संकूल संपुर्णतः बंद राहतील.

सर्व स्पा, सलून, ब्यूटी पार्लर, केश कर्तनालय संपुर्णतः बंद राहतील.

तसेच वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिक, नियत कालिके छपाई व वितरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुर्णतः बंद राहतील. दहावी आणि बारावी ची परिक्षा असल्यामुळे त्यांना यातून वगळण्यात येत आहे, ऑनलाईन शिक्षणास मुभा देण्यात आली आहे.

सर्व प्रकारचे राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम, सभा संमेलने अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम पुर्णतः बंद राहतील.

रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स येथे अन्न पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध. पार्सल सुविधा चालू ठेवण्यात आली असून त्यासाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत वेळ असेल.

को-ऑपरटिव्ह हौसिंग सोसायटी मध्ये 5 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास ती सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषत करण्यात येईल. सोसायटीबाहेरील व्यक्तींना आत प्रवेश प्रतिबंध राहील.

बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था अशा ठिकाणी बांधकाम सुरु ठेवण्यात येईल तसेच बांधकाम साहित्याशी निगडीत साहित्य ने आण करण्यासाठी मुभा असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत पाच पेक्षा जास्त लोकांना येण्यास प्रतिबंध (जमावबंदी)

• सोमवारी ते शुक्रवारी सायंकाळी सहा ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी

शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सातपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर पडण्यास संपूर्णतः बंदी. पूर्णतः लॉकडाऊन

रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, विमा, औषध, किराणा भाजीपाला, मिठाई, बेकरी, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहणार • खासगी बस, रिक्षा रेल्वे सुरू राहणार असल्याचे यात म्हटले

आहे (पीएमपीएलचा निर्णय नऊ एप्रिल रोजी घेणार) उद्याने, मैदाने शुक्रवारी सायंकाळी सात ते सोमवारी सकाळी सात बंद राहतील

सर्व प्रकारची दुकाने, मार्केट व मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्ण बंद राहतील

• अत्यावश्यक सेवांच्या दुकानांत कोरोना नियमांचे काटेकोर नियमांचे पालन. येथे काम करणाऱ्या कर्मचा-यांचे कोरोना लसीकरण आवश्यक. ग्राहकांशी कमीत कमी संपर्क येईल, अशा पद्धतीने कामकाज करावे

• सर्व दुकानांचे चालक, मालक यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे

रिक्षात वाहनचालक व दोन व्यक्तींना परवानगी

टॅक्सी, कॅब, चारचाकीमध्ये 50 टक्के क्षमतेसह

खासगी बसमध्येही उभे राहून प्रवासास मनाई प्रत्येक ट्रीपनंतर वाहन हे सॅनिटाईज करावे

सार्वजनिक वाहतूक सेवेतील कर्मचारी, चालक यांचे लसीकरण आवश्यक. तोपर्यंत त्यांची आरटीपीसीआर चाचणी करावी. लसीकरण अथवा कोविड चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक. अन्यथा 1000 रुपये दंड

रेल्वेत उभे राहून प्रवासास मनाई. अन्यथा 500 रुपये दंड

• नऊ एप्रिलपर्यंत पीएमपीएल बंदच राहणार

बँका, विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या, दूरसंचार, विमा, मेडिक्लेम, औषध निर्माण, वकिल, सीए, वित्तीय संस्था आयटी, आयटीएस, सर्व्हर व इतर आवश्यक काम वगळता इतर सर्व कार्यालये बंद राहणार

• शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार. कोविड संदर्भातील कार्यालये 100 टक्के उपस्थितीत सुरू ठेवता येणार

• सभा, बैठका आ नलाईन पद्धतीने आयोजित कराव्यात सरकारी कार्यालयातील, कंपन्यांत अभ्यागतांना प्रवेशास

मनाई. वेळ पडल्यास ई-पासची व्यवस्था करावी सरकारी व खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेणे आवश्यक

सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क बंद व्हिडीओ गेम पार्लर, जिम, क्लब पूर्णतः राहणार

हॉटेल, रेस्टॉरंट, फूटकोर्ट पूर्णतः बंद राहतील. पार्सल सेवा, घरपोच सेवा सोमवारी ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहील. यात ग्राहक स्वतः हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणू शकतो. मात्र शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सातपर्यंत फक्त घरपोच सेवेकरता मुभा राहील. मात्र हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्याची मुभा नाही.

• घरपोच सेवा देणार्या कर्मचार्यांचे, हॉटेल कर्मचान्यांचे लसीकरण किंवा आरटीपीसीआर चाचणी आवश्यक. हा नियम दहा एप्रिलपासून अमलात येणार. अन्यथा 1000 रुपये संबंधित कर्मचाऱ्याला दंड. वारंवार भंग झाल्यास संबंधित आस्थापनांचा परवाना निलंबित होणार

• सर्व प्रार्थनास्थळे बंद राहणार. तेथील कर्मचार्यांचे लसीकरण अथवा कोरोना चाचणी आवश्यक

• सलून, ब्यूटी पार्लर, केश कर्तनालये संपूर्ण बंद राहतील. येथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे.

• शाळा, कॉलेज बंद राहणार. दहावी व बारावीच्या परीक्षा

संदर्भात वर्ग सुरू राहतील. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णतः बंद

राहतील

• लग्न समारंभासाठी 50 जणांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी

मंगल कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण अथवा कोव्हिड चाचणीचा दाखला बाळगणे आवश्यक. अन्यथा दहा हजार रुपये दंड

• अंत्यसंस्कार, दशक्रिया विधीसाठी वीस जणांच्या उपस्थितीच परवानगी

रस्त्यावरील स्टॉल, टप्या येथे अन्नपदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध, फक्त पार्सल घेऊन जाण्यास सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत परवानगी राहील.

• उत्पादन क्षेत्र पूर्ण क्षमतेने सुरू राहील. येथे सोशल डिस्टन्स पाळणे आवश्यक. सदर आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचे तापनाम तपासणीची व्यवस्था करावी.

• एखादा कामगार कोरोनाबाधित आढळल्यास त्याच्याशी संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आस्थापनांनी स्वखर्चाने विलगीकरण करावे.

• 500 पेक्षा जास्त कामगार असणार्या आस्थापनांनी त्यांचे स्वतःचे क्वारंटाईन सेंटर सुरू करावे.

• जर एखादा कामगार कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण युनिट बंद ठेवून सॅनिटाईज करावे.

• चहा व जेवणाच्या सुट्यांत कर्मचार्यांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. एखादा कामगार कोरोनाबाधित आढळल्यास त्यांना पगारी

वैद्यकीय रजा मंजूर करावी. त्यांची सेवा खंडीत करू नये

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.