Pune News : पुणे महापालिकेकडून सीओईपी वसतिगृहातही 200 बेडची व्यवस्था

एमपीसी न्यूज : महापालिकेकडून शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) वसतिगृहामध्ये 200 कोवड बेडची व्यवस्था केली आहे. शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांचा ताण शिवाजीनगर येथील जम्बो केअर सेंटरवर येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी जम्बो मधील ऑक्सिजन काढल्यानंतर स्थिर झालेल्या रुग्णांना येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

तसेच लवकर जम्बोमध्ये 100 बेड वाढवून हे सेंटर पूर्ण क्षमतेने चालवण्यात येणार असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यवस्थ रुग्णांची संख्या कमी असली तरी त्रास होणार्‍या रुग्णांना शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे मुश्किल झाले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने सीओईपीच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटर 22 मार्च रोजी पुन्हा सुरू केले आहे. सध्या या सेंटरमध्ये 700 बेड कार्यान्वीत आहेत. लवकरच आणखी 100 बेड वाढवण्यात येणार आहेत. आजपर्यंत या ठिकाणी 1276 रुग्ण दाखल झाले असून 415 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर उपचारा दरम्यान 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या या सेंटरमध्ये 639 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच जम्बोमध्ये 10 ते 15 बेड कॅज्युल्टी विभागात आणि 10 बेड तातडीच्या उपचारासाठी तयार ठेवण्यात आले आहेत. ल्याचे अतिरिक्त आयुक्त अग्रवाल यांनी सांगितले.

महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल
शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि गंभीर रुग्णांची संख्या लक्षात घेवून आणि जम्बोवर येणारा ताण कमी करण्यासाठी सीओईपीच्या वसतिगृहामध्ये 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. चार दिवस ऑक्सिजनवर ठेवल्यानंतर ज्या रुग्णास ऑक्सिजनची गरज लागत नाही. मात्र, पुढील काही दिवस रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, अशा रुग्णांना वसतिगृहातील बेडवर हालवण्यात येणार आहे. ही प्रक्रीया लवकरच सुरू करण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.