Pune News : पुणे महापालिका लागली निवडणुकीच्या तयारीला

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने पुणे महापालिका ही कामाला लागली असून, गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासक विक्रम कुमार यांनी निवडणुकीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ७० लाखांच्या खरेदीस मान्यता दिली.

 

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा, असे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्थायी समितीची बैठक घेतली. यात निवडणुकीच्या तयारी व प्रक्रियेतील वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्याच्या ७० लाखांच्या निविदेस मान्यता दिली. यामध्ये कार्यालयीन कामासाठी आवश्यक असणारे पेन, स्टॅपलर, पिन, टाचणी, पेपर,  रजिस्टर, फाइल यासह आदी ८० वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.