Pune Crime News : बांधकामासाठी रक्षा मंत्रालयाची बनावट कागदपत्रे देत पुणे महापालिकेची फसवणूक !

एमपीसी न्यूज : भारतीय हवाई दलाच्या (एअर फोर्स) हद्दीत बांधकाम करण्यासाठी भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाचे बनावट प्रमाणपत्र पुणे महापालिकेकडे सादर केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ही बाब लक्षात आल्यावर एअर फार्सच्या वतीने तिघांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

केलवाणी मंडळाचे अध्यक्ष पुना गुजराथी, कमरुद्दीन शेख आणि त्रिपाठी नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुनीबराम गुप्ता(39रा. एअर फोर्स, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

कोंढवा बुद्रुक येथील जागा एअर फोर्सच्या अखत्यारित येते. या जागेवर बांधकाम करायचे असल्यास केंद्रसरकारच्या रक्षा मंत्रालयाचो ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) लागते. येथे बांधकाम करण्यासाठी पुना गुजराथी, यांहनी शेख व त्रिपाठी यांच्याकडून रक्षा मंत्रालयाची बनावट एनओसी मिळवली होती. ही एनओसी त्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे बांधकामास परवानगी मिळवण्यासाठी सादर केली होती. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.