Pune News : पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुणे महापालिकेकडून शहरातील विविध भागात कोविड केयर सेंटर सुरु

एमपीसी न्यूज – शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पुणे महापालिकेतर्फे शहरातील विविध भागात 9 कोविड केयर सेंटर (covid care centre) सुरु करण्यात आले आहे.

त्यापैकी रक्षकनगर क्रीडा संकुल, खराडी, बनकर शाळा, हडपसर, संत ज्ञानेश्वर वसतीगृह, येरवडा व गंगाधाम अगिशमन विभाग इमारत, बिववेवाडी ही कोविड केअर सेंटर 1250 बेडच्या क्षमतेने सुरु असून त्यामध्ये 589 पेशंट उपचार घेत असून 661 खाटा सध्या उपलब्ध आहेत.

तसेच अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज, होस्टेल, शिवाजीनगर, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, होस्टेल, बालेवाडी, एस.एन.डी.टी. कॉलेज कर्वेरोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे होस्टेल, येरवडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, घोले रोड, पुणे मनपा इ. 5 कोविड केअर केंद्रे तयार असून त्याची क्षमता 1900 असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तसेच आगामी काळात रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता सिंहगड इन्स्टिट्यूट, यडगाव बु, ट्रिनिटी कॉलेज कोंढवा, सीओईपी होस्टेल शिवाजीनगर शासकीय तंत्रनिकेतन शिवाजीनगर, औंध आयटीआय, फर्ग्युसन कॉलेज शिवाजीनगर, निकमार इन्स्टिट्युट- बालेवाडी, नंदन अ‍ॅक्युरा, बाणेर, गणेशकला क्रीडामंच, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठातील हॉल ही 11 ccc ही केंद्रे कार्यान्वित करण्यात येत असून त्यांची क्षमता 4700 आहे.

या कोविड केयर सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पुणे मनपामार्फत सुरू करण्यात आलेल्या ccc मध्ये रुग्ण दाखल होण्याकरीता DM सेलमध्ये नोंदणी करणे वा कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक नसून त्या रूग्णांच्या घरी स्वतंत्र खोली, स्वतंत्र प्रसाधन गृह/शौचालय उपलब्ध नसेल तर अशा रूग्णांना पुणे मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये आपला कोविड टेस्टचा रिपोर्ट दाखवून दाखल होता येईल, त्या करीता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.