Pune News : पुणे महापालिकेकडून सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधीत ऑडीट करण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधीत ऑडीट करण्याचे आदेश आज महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

पुणे परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्या अनुशंगाने पुणे पालिकेकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोविडचे रुग्ण महापालिका हद्दीतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल होत आहेत त्यांच्यावर उपचार करताना रुग्णालयात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असणे, ऑक्सिजन साठवणूक आणि त्याचे वहन सुरक्षित रित्या करणे या गोष्टींची खवरदारी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन साठवणूक यंत्रणा, पुरवठा यंत्रणा आणि ऑक्सिजनबाबतीत सर्व बाबी सुरक्षित असल्याचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडीट करुन घ्यावे व त्यासंबंधीतील रिपोर्ट्स [email protected]  व  [email protected] या इमेल वर पाठवावेत असेही सांगण्यात आले आहे.

तसेच असे ऑडीट न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.