Pune News : लहान मुलांवरील उपचारासाठी पुणे पालिकेची टास्क फोर्स तयार

एमपीसी न्यूज – कोरोनो संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोव्हिड-19 ची लागण होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.हा संभाव्य शहरात लहान मुलांसाठी कोव्हिड संदर्भातील यंत्रणा उभारण्यात येत आहे. महापालिकेने बालतज्ज्ञांचा समावेश असलेली ‘टास्क फोर्स’ स्थापन केली आहे. टास्क फोर्सच्या सूचनेनुसार लहान मुलांवरील उपचारासाठी टास्क फोर्सने केलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण तिसऱ्या लाटेत अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्य सरकार आणि महापालिका सज्ज झाली आहे.

रुबल अग्रवाल यांनी सांगितले, की कोरोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी शिवाजीनगर येथील सीओईपी जंबो कोव्हिड सेंटरमध्ये 50 बेडस्, येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात 200 बेडस् आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोव्हिड केअर सेंटरमध्ये 200 बेडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेने शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या माध्यमातून शहरातील लहान मुलांसाठीच्या खाजगी रुग्णालयांसोबत व तेथील डॉक्टर्ससोबतही समन्वय राखून कामकाज सुरू केले आहे. शहरातील बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन करण्यात आलेे आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार लहान मुलांवरील उपचार पद्धती, औषधे यांची उपलब्धता करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

जंबो रुग्णालयामध्ये मुलांवर उपचारासाठी 5 बेडस्चे आयसीयु सुरू करण्यात येणार आहे. आयसीयुसाठी येथील 5 व्हेंटीलेटर्सचे केवळ सॉफ्टवेअर बदलण्यात येणार आहे. यासोबतच तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार ऑक्सिजन मास्क व अन्य तांत्रिक बाबींची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राजीव गांधी रुग्णालयातही 15 व्हेंटीलेटर्सची सुविधा करण्यात येत आहे. सीएसआरच्या माध्यमातून अथवा थेट खरेदी करुनही हे व्हेंटीलेटर्स तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.