Pune News : पुणे महापालिका 1 जून पासून राबवणार म्युकरमायकोसिस रुग्णांची शोध मोहीम

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचा प्रदूर्भाव कमी होत असताना म्युकरमायकोसिसच नवं संकट उभ ठाकला आहे.दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून पुणे म्युकरमायकोसिसच केंद्र बनले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

1 एप्रिलपासून कोरोनामुक्त झालेल्या सर्व रुग्णांना महापालिकेकडून फोन करून, त्यांना म्युकरमायकोसिस आजाराची कोणती लक्षणे आहेत का? महापालिकेच्या वॉर रूममधून या रुग्णांशी संपर्क साधून या आजाराची कोणती लक्षणे आहेत का?
याची विचारणा करत आहेत.

या आजारासंबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांना, महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात बोलावून कान, नाक, घसा व नेत्र यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे. मात्र, शहरातील ‘म्युकरमायकोसिस’ आजाराचा वाढता धोका ओळखून आता 1 जूनपासून कोरोनामुक्त नागरिकांचं घरोघरी जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.