Pune News: पुणे महापालिका आठ कोविड केअर सेंटर बंद करणार

Pune News: Pune Municipal Corporation will close eight Covid Care Centers पुणे शहरातील 21 कोविड केअर सेंटरपैकी बहुतांशी ठिकाणी 50 टक्केच कोविडचे रूग्ण राहत आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने आठ कोविड केअर सेंटर काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची वाढ कमी होत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या अनेक रूग्णांना ‘होम आयसोलेशन’चा पर्याय महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे अनेक जण कोविड केअर सेंटरमध्ये राहण्यापेक्षा घरी जाणे पसंत करीत आहेत.

पुणे शहरातील 21 कोविड केअर सेंटरपैकी बहुतांशी ठिकाणी 50 टक्केच कोविडचे रूग्ण राहत आहेत. काही ठिकाणी सेंटरच्या एकूण क्षमतेच्या पाच दहा टक्केही रूग्ण नाहीत. त्यामुळे आठ कोविड केअर सेंटर काही काळापुरती बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने सिंहगड कॉलेजची एक पूर्ण इमारत, संत ज्ञानेश्वर हॉस्टेलचा समावेश आहे. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात 21 ठिकाणी कोविड केअर सेंटर उभे केले होते. साधारणत: 12 हजार बेडची क्षमता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.