Pune News : पुणे महापालिका खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेणार

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार पुणे महापालिका खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेणार आहे. याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना खाजगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

मार्च 2020 पासून कोरोनाची साथ भारतभर पसरली आणि तेव्हापासून पुण्याची रुग्णसंख्या ही सर्वाधिक राहिली आहे. या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध स्तरांमधून होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

यातील कोरोना 2020 सी. आर. 97 / आरो- 5, सार्वजनिक आरोग्य विभाग, नवी मुंबई , मंत्रालय 21 मे 2020 च्या अधिसूचनेनुसार कोविड 19 आणि इतर रुग्णांना उपचार मिळण्याचे धोरण लक्षात घेता शासनाने खाजगी रुग्णालयांच्या एकूण ऑपरेशनल बेड्स पैकी 80 टक्के बेड्स आरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्याप्रमाणे येत्या दोन दिवसात 31 मार्च 2021 पर्यंत किंवा त्यापूर्वीच कोविड 19 रुग्णांसाठी 80 टक्के बेड्स उपलब्ध करावेत उर्वरीत 20 टक्के बेड्स हे नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्यात यावेत, तसेच आरक्षित 80 टक्के बेड्सवर कोविडच्या रुग्णांना सर्व प्रकारच्या म्हणजेच आयसोलेशन, ऑक्सीजनयुक्त , आयसीयु (विदाऊट व्हेंटिलेटर) व आयसीयु (विथ व्हेंटिलेटर) या प्रकारचे बेड्सची सेवा विनाविलंब सुरु करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.