Pune News: पुणे महापालिकेच्या 19 प्रसूतीगृहांमध्ये पूर्ण सकस आहार मिळणार- हेमंत रासने

Pune News: Pune Municipal Corporation's 19 maternity hospitals will get full nutritious food - Hemant Rasane पुणे शहरातील प्रसूतीगृहांमध्ये सिझर डिलिव्हरी करण्याचे प्रमाण वाढत आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या 19 प्रसूतीगृहांमध्ये गर्भवती महिलांना पूर्ण सकस आहार दिला जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय मंगळवारी मंजूर करण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापालिकेच्या सर्वच प्रसूतीगृहात शहरातील आर्थिक दुर्बल आणि गोरगरिब कुटुंबातील गर्भवती महिलांना पूर्ण व सकस आहार द्यावा, असा ठराव विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी स्थायी समितीसमोर मांडला होता. त्याला मान्यता देण्यात आली.

पुणे शहरातील प्रसूतीगृहांमध्ये सिझर डिलिव्हरी करण्याचे प्रमाण वाढत आहे. गर्भवती महिलांना योग्य आणि सकस आहार देणे पुणे महापालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करून घेणे, योग्य औषधे देणे अत्यावश्यक आहे. यावर उपाययोजना केल्यास सिझर डिलिव्हरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.