Pune News : अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आजारी व्यक्तीसाठी पुणे पालिकेची व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ मोहीम

एमपीसी न्यूज – शहरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून 18 ते 44-45 च्या पुढील वयोगट, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करला लस देण्यात येत आहे. परंतु, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आजारी व्यक्ती आदी असहाय घटकांना थेट त्यांच्या जागेवर जाऊन लसीकरण केले जाणार आहे. त्याकरिता स्पेशल बसेस तयार करण्यात आल्या असून या मोहिमेला ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ असे नाव देण्यात आले आहे.

शहाराच्या विविध भागांतील सोसायट्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक बाहेर पडू शकत नाहीत. त्यांची शारीरिक क्षमता कमी आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्ती, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत जे लसीकरण केंद्रापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यातच लसीकरण केंद्रांवरील गर्दीही वाढत चालल्याने मुळातच ‘इम्युनिटी’ कमी असलेल्या या नागरिकांना अधिक धोका होऊ शकतो. या घटकांसाठी ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

पालिकेला या उपक्रमासाठी काही संस्थानी मदत केली आहे. सध्या चार बस तयार करण्यात आल्या आहेत. भविष्यात प्रत्येक प्रभागात एक मोबाईल व्हॅन सुरू करण्याचा विचार आहे. काही संस्थासोबत एममोयूदेखील करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.