Pune News : 31 डिसेंबरच्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

एमपीसीन्यूज : शहरातील गणेश कला क्रीडा केंद्रात 31 डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याच्या परवानगीची मागणी समितीने स्वारगेट पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी हा अर्ज वरिष्ठांकडे पाठविला होता. मात्र, आता पोलिसांनी पुण्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण असल्याकारणाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आहे.

कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला अनुयायी भेट देतात. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी समितीने स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, त्यावर वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून या कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

दोन वर्षांपुर्वी आयोजित एल्गार परिषदेत देशविरोधी भाषणांमुळे अनेक विचारवंचातासह दिग्गजांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.