Pune News : पुणे पोलीस दलातील उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहर पोलीस दलातील उपनिरीक्षक चंद्रकांत झेंडे (वय 54) यांचा कोरोनामुळे मुळे मृत्यू झाला. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते परंतु उपचार सुरु असताना आज दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत झेंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु आज दुपारच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. झेंडे कर्मचारी म्हणून पुणे शहर पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर भरती होऊन ते नुकतेच उपनिरीक्षक पदावर पोहोचले होते. सध्या नियंत्रण कक्षात नेमणूकीस होते.

अत्यंत शिस्त प्रिय आणि सर्वांशी हसून खेळून राहत असल्याने ते पोलीस दलात ओळखले जात असे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुल, पत्नी असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.