22.2 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 16, 2022

Pune News : 8 हजार 370 कोटींचा अंदाजपत्रक सादर करून पुणेकरांची फसवणूक : दीपाली धुमाळ

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – मागील चार वर्षांत पालिकेचे उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपयांच्या आसपास राहिले आहे. मात्र स्थायी समितीने 8370 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. आत्मविश्वास असावा पण नागरिकांची फसवणूक करण्याइतपत बेगडी नसावा, अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

महसुली खर्च वाढत आहे. भांडवली खर्चाला प्रशासन चाप लावत आहे. त्यांनाही उत्पन्न गोठत चालल्याची जाणीव आहे. परंतु प्रशासनच उसने अवसान आणून आणि महापालिका कर्ज बाजारी करून अंदाजपत्रक फुगवत आहे, त्यात आपण हवा भरत आहात. मध्यवर्ती भागात 10 रुपयांत प्रवास संकल्पना चांगली आहे. पण मुद्दा आहे तो शहराच्या अन्य भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांचा. उलट अन्य भागातूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक मध्यवर्ती भागात येतात. मध्यवर्ती भागात व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि खरेदी साठी येणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

हडपसर, कात्रज, नगररोड, वारजे, धायरी, बोपोडी अशा उपनागरातून शहरात स्वारगेट, पुणेस्टेशन, शिवाजीनगर अशा केंद्रीय ठिकाणापर्यंत 10 रुपयांत प्रावस ठेवल्यास किमान शहराच्या मध्यवर्ती भागात खासगी वाहनांचा वापर कमी होईल. तर मध्यवर्ती भागात अटल सेवेने 5 रुपयांत प्रवासही करणे शक्य होईल. येऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी बसेस ची अल्पदारातील कनेक्टिव्हिटी फायदेशीर ठरेल, असे मला वाटते. परत यासाठी येणारा खर्च कसा उचलणार ? तोटा वाढल्यास तो कसा भरून देणार याचे स्पष्टीकरण अध्यक्षांनी द्यावे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेचा प्रीमियम 7 ते 8 कोटी रुपये. तर या योजनेच्या जनजागृतीचा खर्च 5 कोटी रुपये. महापौर मुळातच ही नियमित कर भरणाऱ्या नागरिकांसाठी योजना आहे. तीन वर्षे झालेय ही योजना राबवतोय. मिळकत कराच्या बिलांवर योजनेचा तपशील दिला तरी थेट मिळकत दाराला माहिती मिळणार आहे. दुसरे मिळकत कर विभागाकडे सर्व प्रॉपर्टी धारकांचे मोबाईल नंबर आहेत. त्यावर योजनेचा तपशील पाठवला तरी जनजागृती होणार आहे. मग पाच कोटी रुपये नेमके कोणाच्या घशात घालण्यासाठी ठेवले आहेत?

पीपीपी तत्वावर रस्ते आणि नदी पूल करण्याला यापूर्वीच मान्यता दिली आहे. आता सारसबाग, तुळशीबाग, मंडई, महर्षी दाते मुद्रणालय देखील पीपीपी तत्वावर विकसित करण्याचे स्वप्न दाखवले आहे, अशी टीकाही दीपाली धुमाळ यांनी केली.

सर्व प्रकल्प 5 हजार कोटी रुपयांचा पुढील आहेत. यातून पुढील 10 वर्षात महापालिकेवर दरवर्षी साधारण 500 कोटी रुपयांचे दायित्व येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकल्पाचे स्वप्न विधानसभेचे उमेदवार म्हणून दाखवली हे यातून दिसून येते. तुमच्या आमदारकीच्या स्वप्नासाठी उर्वरित शहर ‘ कंगाल ‘ आणि ‘ बकाल ‘ करू नका. आजही आमच्या उपनगरातील रस्ते पूर्णपणे विकसित होऊ शकलेले नाहीत, पावसाळी गटारे नसल्याने रस्त्यावर ओढे वाहतात . ही कामे करण्यासाठी पहा तुमचे ‘विकसक मित्र ‘ पुढे येताहेत ? असे झाल्यास पुणेकर तुम्हाला आमदारच काय पुढचा खासदारही करतील.

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. परंतु, आपल्याला शिक्षणाचाच विसर पडलेला आहे. कोरोनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अगोदरच गरिबीमुळे शाळाबाह्य राहणाऱ्या वैद्यर्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामध्ये कोरोना मुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थिने अधिकच भर पडली आहे.

सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. दुर्दैवाने कोरोनाची परिस्थिती आणखी काही महिने अशीच राहिल्यास गरीब मुलांचा शिक्षणापासून संबंधच तुटण्याची भीती आहे.  अशा वर्गाचा प्रामुख्याने महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या एक लाखाहून अधिक विद्यर्थ्यांच्या भवितव्याचा विचार अंदाजपत्रकात करण्यात आलेला नाही.  ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी नवीन कुठलेच ठोस कार्यक्रम देण्यात आले नाहीत. अध्यक्ष तुम्ही गरिबांना विसरलात. केवळ कोट्यवधींचे आकडे फुगवून आणि विकासाची आभासी प्रतिमा दाखवून आपण ही ‘अच्छे दिन’चे निवळ गाजर दाखवले आहे.

महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी विरोधात असतानाही आम्ही सहकार्याचीच भूमिका ठेवली आहे. परंतु याचा अर्थ उत्पन्न वाढवण्यासाठी उद्या तुम्ही महापालिका विकायला काढाल तर त्याला आमचा विरोध राहील. चार वर्षांत काही जमले नाही. एक असा प्रकल्प दाखवा की तो तुम्ही केलाय हे ठामपणे सांगू शकाल. भामा आसखेड प्रकल्प, चोवीस तास पाणी पुरवठा, मेट्रो, हे प्रकल्प आम्हीच सुरू केले. पण चार वर्षात एखादं दुसरा उड्डाणपूल वगळता काय केले हे सांगायला आपल्याकडे नाही.

त्यामुळे अध्यक्ष आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अजून दोन, चार स्वप्नवत कल्पना मांडल्या असत्या तरी चालले असते. कारण मागील सहा साडेसहा वर्ष देश फक्त स्वप्नातच जगतोय, त्याला तुम्ही तरी कसे अपवाद ठरणार

spot_img
Latest news
Related news