Pune News : पुणेकरांनो, आपले पाणी मीटरचे रिडींग पाठवा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमुळे व्यावसायिक अस्थापना बंद असल्याने तसेच शहरातील काही भागांतील सोसायट्यांमध्ये मीटरद्वारे पाणी देण्यात येत असले तरी करोनामुळे या भागात बाहेरील नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आल्याने महापालिकेस मीटरचे रीडिंग घेता आलेले नाही. त्यामुळे महावितरणच्या धर्तीवर आता महापालिकेकडूनही पाणीमीटरचे रीडिंग पाठविण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले आहे.

महापालिकेकडून शहरात समान पाणी योजनेअंतर्गत व्यावसायिक मिळकतींना पाणी मीटर बसविले आहेत.

याशिवाय, काही प्रमुख सोसायट्या आणि लष्कर भागातील लष्कारांच्या मिळकतींना मीटरद्वारे पाणी देण्यात येते. या मिळकतींचे रीडिंग महापालिकेकडून नियमित घेतले जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे तसेच करोनामुळे महापालिकेस हे रिडींग घेता आलेले नाहीत. त्यामुळे बीले तयार नसल्याने महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेनेच आता पुणेकरांना मीटर रिडींगची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

त्यासाठी महापालिकेने मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोबाइल क्रमांक जाहीर केले असून त्यांच्या मोबाइल व्हॉट्स अ‍ॅ पवर फोटो पाठवावेत. अथवा या अधिकाऱ्यांना मेसेज करावे तसेच शक्य नसल्यास या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन केल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.