Pune News : पुणेकरांनी कोरोना नियमांचे स्वयंस्फूर्तीने पालन करावे ; सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे लॉकडाउन कालावधीत पुणेकरांनी संयम बाळगून नियमांचे पालन केले होते. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळीनंतर नववर्षांच्या स्वागतासाठी नागरिकांनी घरातच राहून पोलिसांना सहकार्य केले होते. त्यानुसार आता नव्याने शासनाच्या निर्णयानुसार पुणेकरांनी पुर्वीप्रमाणेच स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत भर पडत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कचा वापर करणे, विनाकारण भटकंती टाळणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन केल्यास कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाच्या कोरोना नियमावलीनुसार नागरिकांनी पालन करावे, असेही आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनासह स्थानिक पातळीकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळता येऊ शकतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.