Pune News : पुणे विद्यापीठाची परीक्षा 11 एप्रिलपासून ; एमसीक्यू पद्धतीने होणार परीक्षा

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा अकरा एप्रिलपासून सुरू होणार आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांची परिक्षा बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) पद्धतीने पन्नास गुणांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा 50:20 या सूत्रानुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशा पद्धतीने ही परीक्षा घेण्याची क्षमता या कंपनीची नसल्याने 50:20 सूत्र रद्द करण्यात आले आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष या सर्वांची सरसकट 50 गुणांची एमसीक्यू परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे, त्याचे वेळापत्रक 20 ते 25 मार्च दरम्यान जाहीर होईल. ही परीक्षा विद्यापीठाची स्वतःची कंपनी असलेली एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन ही कंपनी घेईल. सर्व अभ्यासक्रमांच्या व सर्व वर्षाच्या परीक्षा 50 गुणांची एमसीक्यू पद्धतीने होईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.