Pune News : गुरूवार ऐवजी शुक्रवारी पुण्याचा पाणी पुरवठा राहणार बंद !

एमपीसी न्यूज : जलशुद्धीकरण केंद्रांची विविध कामे करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 7) बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, याला नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आता गुरुवारऐवजी शुक्रवारी (दि.8) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग येथील पंपिंग, स्थापत्य, तसेच देखभाल व दुरुस्तीविषयक तातडीची कामे करण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी (दि. 7) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची आणि शुक्रवारी (दि. 8) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्याची घोषणा केली होती.

मात्र, त्यात मंगळवारी सायंकाळी अचानक बदल करण्यात आला. तांत्रिक कारण देत शहरातील पाणीपुरवठा गुरुवारऐवजी शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. लग्नाचा मोठा मुहूर्त असल्याने नगरसेवकांनी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास विरोध केला. त्यानुसार प्रशासनाने बदल केल्याचे सांगण्यात येत आहे.

शुक्रवारी खालील भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद 

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती गाव, मुकुंदनगर, सहकारनगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र 42, 46 कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

एसएनडीटी, वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, बावधन, बाणेर, चांदणी चौक, महात्मा सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, सूस, सुतारवाडी, भूगाव रस्ता, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज, महात्मा सोसायटी, गुरुगणेशनगर.

लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा परिसर, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, मुंढवा, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, गोंधळेनगर, सातववाडी.

नवीन होळकर पंपिंग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर, नगर रोड परिसर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.