Pune News : मराठा महासंघाकडून लाल महलात गोमूत्र शिंपडून शुध्दीकरण

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील लाल महालामध्ये लावणीच्या रील्सचं चित्रीकरण झाल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडकडून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात आपला निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाने जिजाऊंच्या पुतऴ्याला दुग्धाभिषेक करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 

यासंदर्भात वैशाली हिने आधीच माफी मागितली असली, तरी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.तसेच, ज्या ठिकाणी हे चित्रीकरण झालं, त्या भागात गोमूत्र शिंपडून त्याचं शुध्दीकरण केल आहे.

 

नेमक काय घडल?

पुण्यातील ऎतिहासिक वास्तू असलेल्या लाल महालामध्ये एका तमाशाच्या गाण्यावर चित्रीकरण झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आले. मानसी पाटील,कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी मिळून हे चित्रीकरण केल्याची माहिती देखील समोर आली आहे. या गाण्याच्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या आठवणींचा ऎतिहासिक वारसा असणार्या लाल महालामध्ये अशा गाण्यांचं चित्रीकरण होणे हा लाल महालाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रीया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे.त्यानंतर कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दरम्यान, शुक्रवारी उघड झालेल्या या प्रकारानंतर आज अखिल भारतीय मराठा महासंघाकडून लाल महालात जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दुग्धाभिषेक करण्यात आला.त्यानंतर जेथे चित्रीकरण झाले तेथे गोमुत्र शिंपडून शुध्दीकरण करण्यात आले.त्यानंतर वैष्णवी पाटील हिनं माफी मागितल्याचा व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.