Pune News : प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या कार्यालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज – कोथरुडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहजानंद सोसायटी येथील निवासस्थानातील जनसंपर्क कार्यालयाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन मेधा कुलकर्णी यांचे अभिनंदन करण्यात आले.

यावेळी कोथरुडचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, संघटन सरचिटणीस सचिन पाषाणकर, पुणे शहर भाजपा चिटणीस अनिता तलाठी, रिपाइं (आ.) चे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, यांच्यासह भागातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमात मेधा कुलकर्णी यांच्या कन्या वास्तुविशारद कल्याणी कुलकर्णी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून प्रा. मेधा कुलकर्णी राजकारणात चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतलेली भेटही चर्चेची ठरली. पुणे पदवीधर मतदारसंघात त्या निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.