Pune News : प्रा. समीर आबनावे यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी

एमपीसी न्यूज – प्रा. समीर विठ्ठल आबनावे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी मिळाली. प्रा. आबनावे हे महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन या महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

प्रा. डॉ. बाळकृष्ण रामचंद्र लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भटक्या-विमुक्त समाजाचे जीवन चित्रण करणारी मराठी कादंबरी : वाड्मयीन व समाजशास्त्रीय अभ्यास’ या विषयावर त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. या त्यांच्या यशाबद्दल महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के.डी. कांचन यांनी त्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन केले. तसेच प्राचार्य डॉ. आर के.अडसूळ यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.