Pune News: भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदी राघवेंद्र मानकर

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा शहराध्यक्षपदी राघवेंद्र मानकर यांची निवड करण्यात आली आहे.

देशातीलसर्वार्थाने सर्वात मोठा अश्या भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुणे शहर अध्यक्षपदी माझी निवड झाली. माझे नेते, पुण्यनगरीचे लाडके खासदार गिरीश बापट यांच्या आशीर्वादाने तसेच प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील, कसबा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ता टिळक, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पुणे शहरातील पक्षातील सर्व जेष्ठ नेते आणि मार्गदर्शक यांच्या सहकार्याने मिळालेली ही जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडेल.

युवा या शब्दाला उलट वाचलं तर वायु शब्द तयार होतो. शहरातील युवा मोर्चाच्या सर्व आजी माजी सहकार्‍यांच्या सोबतीने वायु वेगाने येणार्‍या काळात युवा मोर्चा काम करेल. युवकांना आश्वासक असे वातावरण मी सगळ्यांच्या साथीने नक्की तयार करेन अशी मी आपणास आज ग्वाही देतो.

माझ्या या सर्व प्रवासात मला साथ देणार्‍या प्रत्येकाचे आज मी आभार मानतो या पुढेही आपण असेच माझ्या कामाची ऊर्जा बनून सोबत द्याल ही मला खात्री आहेच, असे निवडीनंतर राघवेंद्र मानकर यांनी सांगितले. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.