Pune News : राही कदम प्रेरणा पुरस्कार सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – श. ल. चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिला जाणारा राही कदम प्रेरणा पुरस्कार नुकताच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून विविध क्षेत्रात उच्च स्थान निर्माण करणाऱ्या शहर आणि ग्रामीण भागातील महिलांना प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदा पुरस्काराचे हे चौथे वर्ष होते.

यावर्षी या सोहळ्यास शासकीय अधिकारी भावना अगरकर, डॉ. आकाश शहा, अभिनेत्री रोशनी कपूर व अध्यात्मिक गुरु सोनाली राव उपस्थित होते. यावर्षी 21 महिलांची पुरस्कारार्थी म्हणून निवड करण्यात आली होती.

सपना सस्तकर (नृत्यांगना), आरती चव्हाण (उद्योजिका), प्रगती अहिरे (पाक कला, मास्टरशेफ), निरुपमा (आहारतज्ञ), हिमाद्री हिर (सेलिब्रिटी स्टायलिस्ट), डॉ. अश्विनी साळुंखे (त्वचा रोग तज्ञ), नाझ शेख (सेलिब्रिटी फॅशन डिझयनर), नेहा वर्मा मदान, गायत्री लखानी (लेखिका) सीमा तनवर (सामाजिक कार्य), भाविषा परमार (मिसेस महाराष्ट्र), अनिता साळवी (माणदेशी फाउंडेशन), अलमास अल्फ्रेड (फ्लेवर्स स्ट्रीट संस्थापिका), सविता दहिभाते (प्राध्यापक), सरिता दिमटे (कलाकार), मृणाल ईनामदार (राजदूत, पिंकथॉन शर्यत ) अशा विविध क्षेत्रातील अनेक महिलांना पुरस्कार देण्यात आले.

संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर बंटी धर्मा व त्यांच्या पत्नी तसेच सातारा जिल्ह्यातील सिव्हील हॉस्पिटल मधील नर्स शोभा महाले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेशू अग्रवाल व आर जे निसर्ग यांनी केले. प्रतिभा आरडे, मयूरी येवले, उज्वला कोंडे, अर्चना गोसावी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रतिष्ठानचे सदस्य हर्षवर्धन कदम, राजवर्धन कदम, भास्कर शिंदे, प्रतीक भगत यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.