Pune News : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात

0

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये सायंकाळी साडेपाचनंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. पाच वाजता सोसाट्याचा वारा सुरु झाला त्यानंतर मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस सुरु झाला.

पिंपरी चिंचवड परिसरातही ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच धांदल उडाली. पथारी, हातगाडीधारकांनी रस्त्यालगतच्या इमारतींचा आसरा घेत आपले साहित्य हलविले.

चिंचवडगावातील काकडे पार्क येथे झाड पडले तर किवळे -विकासनगर येथे एका झाडावर वीज कोसळल्याचे वृत्त आहे.

किवळे-विकासनगर येथे वीज कोसळून नारळाचे झाड पेटले

_MPC_DIR_MPU_II

आज सायंकाळी अचानक आलेल्या पावसात किवळे-विकासनगर येथे पाटील मेडिकल येथील विजय पाटील यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे या झाडाने पेट घेतला. पाटील कुटुंबीय आणि नागरिकांनी झाडावर पाणी मारले. अग्निशन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग आटोक्यात आली होती.

 

 

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि  माध्यम  ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर शहर आणि परिसरात हवामान कोरडं राहिल. यामुळे पुणेकरांनी आणि घाटमाथ्यावरील गावांनी काळजी घेत आपल्या शेतमालाचीही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज म्हणजे 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांनीही आपल्या मालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.