Pune News: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरूच, 86.89 टक्के पाणीसाठा

Pune News: Rain continues in dam area supplying water to the city, 86.89 per cent water storage खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने मुठा नदीपात्रात केला जाणारा विसर्ग 2 हजार 568 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत या चारही धरणांत 86.89 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

खडकवासला 1.97 टीएमसी (100 टक्के), पानशेत 10.32 टीएमसी (96.91 टक्के), वरसगाव 10.58 टीएमसी (82.50 टक्के), टेमघर 2.46 टीएमसी (66.33 टक्के) असा एकूण 25.33 टीएमसी म्हणजेच 86.89 टक्के पाणीसाठा आहे.

गेल्या वर्षी आजच्या दिवशी 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्के धरणे भरलेली होती. ही आकडेवारी सोमवारी सकाळी 6 पर्यंतची आहे. यावर्षीही लवकरच धरणे भरणार असल्याची चिन्हे आहेत. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने मुठा नदीपात्रात केला जाणारा विसर्ग 2 हजार 568 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे.

यामुळे नदीपात्रातील रस्त्यासह बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी खुला असेल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे महापालिकेतर्फे महिन्याला धरणातून दीड टीएमसी पाणी उचलले जाते. वर्षाला या हिशोबाने पुणेकरांना 18 टीएमसी पाणी लागते.

आता पुणेकरांच्या दोन वेळच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. आता तब्बल 25.33 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे हे पाणी शेतीलाही देता येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणखी दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.