Pune News: पावसाचा परिणाम, फळभाज्यांची आवक घटली; 10 ते 20 टक्क्यांनी दरवाढ

Pune News: Rains affect fruit and vegetable arrivals; 10 to 20 percent price increase बाजारात 70 ते 75 ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील रविवारी ही आवक 100 ट्रकवर होती.

एमपीसी न्यूज – सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे फळभाज्यांची मार्केट यार्डातील आवक घटली आहे. त्यामुळे कांदा, बटाटा, टोमॅटो, ढोबळी मिरची, हिरवी मिरचीच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी रविवारी सांगितले.

बाजारात 70 ते 75 ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील रविवारी ही आवक 100 ट्रकवर होती. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये कर्नाटक व गुजरात येथून 2 ते 4 ट्रक कोबी, इंदूर येथून 9 टेम्पो गाजर, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 3 टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची 8 ते 10 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले 800 ते 900 पोती, मटार 250 गोणी, कोबी 4 ते 5 टेम्पो, फ्लॉवर 7 ते 8 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 3 ते 4 टेम्पो, तांबडा भोपळा 7 ते 8 टेम्पो, भुईमुग शेंग 100 ते 125 पोती, टोमॅटो 1500 ते 2000 क्रेट्स, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, कांदा 50 ते 55 ट्रक, आग्रा, इंदूर येथून मिळून 40 ट्रक बटाटा इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 100-130, बटाटा : 220-260, लसूण : 800-1200, आले : 300-450, भेंडी : 150-200, गवार : 250-300, टोमॅटो : 250-300, दोडका : 180-200, हिरवी मिरची : 250-300, दुधी भोपळा : 80-120, चवळी : 150-200.

काकडी : 60-100, कारली : हिरवी 180-200, पांढरी 100-120, पापडी : 160-180, पडवळ : 150-200, फ्लॉवर : 150-200, कोबी : 70-120, वांगी : 180-200, डिंगरी : 180-200, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 300-350, तोंडली : कळी 200-250, जाड : 90-100, शेवगा : 400-500, गाजर : 140-160.

वालवर : 250-300, बीट : 60-80, घेवडा : 200-250, कोहळा : 100-120, आर्वी : 150-200, घोसावळे : 140-150, ढेमसे : 180-200, पावटा : 250-300, भुईमूग शेंग : 300-350, मटार : स्थानिक : 750-850, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

कोथिंबीर, मेथी, मुळा, कांदापात तेजीत
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 5 ते 10 रूपयांनी वाढ झाली आहे. चाकवत, पुदिना, राजगिरा, चुका या पालेभाज्यांच्या भावातही जुडीमागे 1 रूपयांची वाढ झाली आहे. तर, मेथी, कांदापातच्या भावात जुडीमागे 2 रुपये, मुळे 2 ते 3 रुपये, करडई, चवळईच्या भावात 1 रूपयांनी घट झाली आहे. रविवारी कोथिंबीरची 80 लाख जुडी, तर मेथीची 50 हजार जुडी इतकी आवक झाली.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 1500-3000, मेथी : 800-1200, शेपू : 300-600, कांदापात : 1000-1200, चाकवत : 500-700, करडई : 500-700, पुदिना : 300-500, अंबाडी : 500-700, मुळे : 800-1200, राजगिरा : 500-700, चुका : 500-800, चवळई : 500-600, पालक : 500-800.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.