-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune News : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन अल्पकाळात उरकू नये – आमदार सिद्धार्थ शिरोळे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्यापुढे राजकीय, सामाजिक तसेच शेती, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण याविषयीचे प्रश्न उभे राहिले आहेत. यावर सांगोपांग चर्चा होण्याकरिता विधीमंडळाचे पूर्ण काळ अधिवेशन घेतले जावे अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

कोविड साथीच्या कारणाने यापूर्वीचे जवळ जवळ सर्व अधिवेशन हे अल्पकाळ घेण्यात आले. मात्र, आता कोविड प्रतिबंधक लसीचा ठोस पर्याय आपल्यापुढे आहे. तरी कोविडच्या कारणाने अधिवेशन अल्पकाळात उरकण्यात येऊ नये अशी मागणी शिरोळे यांनी केली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

माझ्या माहितीप्रमाणे केंद्रामध्ये 400 हून अधिक खासदारांचे लसीकरण झाले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये जवळ जवळ निम्मे आमदार आणि बहुसंख्य कर्मचारी वर्ग यांनी लसीचे डोस घेतलेले आहेत. उरलेल्यांना पहिला डोस देण्यात यावा. हे काम काही फार अव्हणात्मक नसून राज्य सरकार ने तयारी दाखवली तर सहज शक्य आहे असे शिरोळे म्हणतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लसीकरण मोहीमेला गती दिली जात आहे. त्याचा लाभ घेत आमदार आणि प्रशासकीय स्टाफला प्राधान्याने लस देण्यात यावी आणि अधिवेशन हे पूर्ण काळ घेण्यात यावे, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी आपल्या पत्रा द्वारे केली आहे

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.