Pune News : बालवाडी कर्मचा-यांना सणासाठी  पाच हजारांची उचल 

एमपीसी न्यूज – महापालिका प्राथमिक शिक्षण विभागातील बालवाडी शिक्षिका आणि बालवाडी सेविकांना सणासाठी पाच हजार रुपये उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘सन 2012 पासून या कर्मचा-यांना दरवर्षी सणासाठी अडीच हजार रुपये उचल दिली जाते. वाढलेला खर्च लक्षात घेऊन या वर्षीपासून त्यात दुपटीने वाढ करून पाच हजार रुपये उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

दरमहा वेतनातून दहा समान हप्प्यात त्याची वसुली केली जाते. या योजनेचा 493 बालवाडी शिक्षिका आणि 338 बालवाडी सेविका अशा एकूण 831 कर्मचा-यांना लाभ होणार आहे. त्यासाठी 41 लाख 55 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.’

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.