Pune News : पुण्यात श्वान संगोपन केंद्राचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

वसंत मोरे यांची भेट घेऊन नदी सुधार प्रकल्पाचा घेतला आढावा

एमपीसी न्यूज- राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर (Pune News) आहेत. या दौऱ्यात त्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते वसंत मोरे यांची भेट घेतली व मोरे यांनी पुण्यातील कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटनही केले.

 

Pimpri News : अपयशी ठरलेल्या भाजप नेत्यांकडून मुद्दे भरकटविण्याचा प्रयत्न – अजित गव्हाणे

 

 

या दौर्‍यात ते पुण्यात होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेतला असून या प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध आहे. या प्रकल्पांतर्गत सहा हजार झाडांची कत्तल होणार असल्याच्या कारणाने अनेक पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाचा विरोध केला आहे.वसंत मोरे यांनी त्यांना या प्रकल्पाबाबत अधिक माहिती दिली.राज ठाकरे यांनी या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेतल्यानंतर या प्रकल्प संदर्भात फोटो आणि माहिती मागून घेतली आहे.

 

 

 

 

 

या वेळी सिद्धांत शेळके या मुलाने एक झाड आणि त्यावर एक झोपाळा असे चित्र राज ठाकरे यांना दाखविले. त्यांनी त्या  मुलाच्या चित्राचे  कौतुक करत, त्या  झोपळयावर कोणी तर बसव असा मिश्किल सल्ला दिल्याने  (Pune News) उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.