Pune News: रमेश कुलकर्णी यांचे काम समाजासाठी आदर्शवत – शिरीष भेडसगांवकर

0

एमपीसी न्यूज – समजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत देण्याचे रमेश नरसिंह कुलकर्णी यांचे काम आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीष भेडसगांवकर यांनी काढले.

सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रमेश कुलकर्णी यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील लक्ष्मण भुवन येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरद ढोले, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अभय (माधवराव) माटे, जनता बँकेचे महाव्यवस्थापक जगदीश कश्यप, भटके विमुक्त प्रतिष्ठानचे धनंजय विचारे,  तळेगाव दाभाडे येथील उद्योगधामचे उपाध्यक्ष सुहास नाखरे, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, चंद्रशेखर साठे, प्रांत धर्म जागरण प्रमुख हेमंत हरहरे, क्रीडा भारतीचे मिलिंद डांगे, आरोग्य भारतीचे डाॅ. संतोष गटणे, जनजागरण प्रतिष्ठानचे संतोष दिघे, सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

भेडसगांवकर म्हणाले की, सोलापूर जिल्हातील ग्रामीण भागाची पाश्वभूमी असूनही संघ संस्कारांमुळे रमेश कुलकर्णी यांनी दातृत्वता दाखविली. सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य या नात्याने पोमलवाडी उजनी धरणाच्या निर्मितीनंतर करमाळा तालुक्यातील पश्‍चिम भागातील अनेक लोकांना पुनर्वसन करण्यासाठी मदत केली.

रमेश नरसिंह कुलकर्णी यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी यमगरवाडी येथील भटके विमुक्त प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला 81 हजार रुपयांची, तळेगाव दाभाडे येथील सरस्वती शिक्षण संस्था या शाळेला 51 हजार रुपयांची तर धर्म जागरण समितीला (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) 31 हजार रुपयांची मदत केली. या व्यतिरिक्त तळेगाव दाभाडे येथील उद्योगधाम या कुष्ठरुग्ण पुनर्वसन संस्थेला 81 किलो धान्य देण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन सदानंद कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III