Pune News : तुळशीबागेतील पेशवेकालीन श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – श्रीरामनवमी उत्सव पेशवेकालीन तुळशीबाग (Pune News) मंदिरात पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.तुळशीबाग श्रीराम मंदिरातील उत्सवाचे 262 वे वर्ष आहे.

 

Pune News : श्रीराम नवमी निमित्त रंगला ‘ कीर्तन संवाद ‘

 

मंदिरात सकाळी पवमान अभिषेकाने सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिरात आकर्षक पुष्पसजावट तसेच विद्युतरोषणाई करण्यात आली होती. कीर्तनकार उद्धवबुवा जावडेकर यांनी जन्मकीर्तन सादर केले. दुपारी बारा वाजून 40 मिनिटांनी सभामंडपातील पाळणा हलविण्यात आल्यानंत भाविकांनी श्रीराम नामाचा जयघोष केला.

 

त्यानंतर मंदिराच्या परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. कीर्तन आणि श्रीरामजन्म सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 

या वेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त श्रीपाद तुळशीबागवाले, विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले यांच्यासह (Pune News) तुळशीबागवाले कुटुंबीय उपस्थित होते.या सोहळ्यात पारंपरिक वेशात भाविक सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.