मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Pune Fire News : रामटेकडी कचरा डेपोला आग ; आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अग्निशमन’चे प्रयत्न

एमपीसी न्यूज : हडपसर रामटेकडी (Hadapsar Ramtekdi) येथील औद्योगिक वसाहतीनजीक कचरा डेपोला ( waste depot ) आज, रात्री आठच्या सुमारास भीषण आग ( Fire) लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या रवाना झाल्या असून जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अग्निशमन ( fire brigade)  विभागाकडून देण्यात आली.

पुणे महापालिकेचा सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. तसेच सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प देखील आहे.

शहर आणि उपनगरातील कचरा टाकल्यामुळे याठिकाणी कचऱ्याचे अक्षरश: डोंगर तयार झाले आहेत. याठिकाणी उन्हाळ्यात मिथेन गॅस तयार होऊन देखील आगी लागण्याच्या अनेकवेळा घटना घडल्या आहेत.

परंतु, आज शनिवारी रात्री उशिरा अचानक आग लागली की जाणूनबुजून लावली गेली याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे. दरम्यान, या कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट दूरवर पसरून प्रदुषण वाढले. तसेच बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझविण्यामध्ये अडचणी येत आहे.

Latest news
Related news