Pune News : बलात्कार पीडित महिलांसाठी पुण्यात ‘रेप क्रायसिस सेंटर’

एमपीसी न्यूज – बलात्कार पीडित महिलांच्या मनातली नकारात्मक भावना दूर करण्यासाठी, त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि कायदेविषयक मदत करण्यासाठी ‘सहयोग ट्रस्ट’च्या वतीने पुण्यात ‘रेप क्रायसिस सेंटर’ सुरू करण्यात आलं आहे.

बलात्कारासह जगणाऱ्यां महिलांना त्यांचे दुःख आणि समस्या सांगण्यासाठी एक सुरक्षित जागा म्हणून ‘सपोर्ट ग्रुप’ चालवण्यात येणार आहे. यामाध्यमातून त्यांच्या मनातील ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रशिक्षित व्यक्तींच्या माध्यमातून बलात्कारग्रस्त स्त्रियांचे समुपदेशन करून त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी मोफत मदत केली जाणार आहे. तसेच, कायदेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.

याठिकाणी करता येईल संपर्क :
रेप क्रायसिस सेंटरसाठी, असीम सरोदे आणि असोसिएट्स, फ्लॅट क्रमांक 5, प्रथमेश सीएचएस, लेन क्रमांक 5, प्रभात रोड, डेक्कन जिमखाना, पुणे या पत्त्यावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

यासोबतच [email protected] हा ई-मेल आयडी किंवा 020-25459777 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.