Pune News : घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार करून अश्लील क्लिप नवऱ्याच्या व्हाट्सअपला पाठवली, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : घरकाम करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करू तिचा अश्लील व्हिडिओ पीडित महिलेच्या नवऱ्याच्या व्हाट्सअप वर पाठवले. त्यानंतर संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हिम्मतसिंग धीमान (रा. वृंदावन नगर सैनिकवाडी वडगाव शेरी पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका 44 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. जून 2014 ते 2019 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला 2014 ते 2020 या कालावधीत आरोपीच्या घरी घरकाम करण्यासाठी जात होती. या कालावधीत आरोपीने पीडितेच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच कळत नकळत शारीरिक संबंधाची व्हिडीओ क्लिप त्याने तयार केली होती.

त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करतो, तुझा दोन मुलांचा सांभाळ करतो, याबाबत कोणालाही काही एक सांगू नकोस असे सांगत त्याने पीडित महिलेला धमकावले होते. परंतु पुढे तिने त्याच्या मागणीला नकार दिला होता.

त्यामुळे या सर्व प्रकारानंतर आरोपीने 29 जून रोजी या दोघांच्या शरीरसंबंधाची अश्लील व्हिडिओ क्लिप पीडित महिलेच्या पतीच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवली. या सर्व प्रकारानंतर महिलेने तक्रार दिली असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.