Pune News : प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना यंदाचा राष्ट्रीय बंधुता पुरस्कार

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘राष्ट्रीय बंधुता पुरस्कार’ माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना जाहीर झाला आहे.

परिषदेच्या वतीने होणाऱ्या 22 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे 31 वे वर्ष असून, पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

बावीसावे बंधुता साहित्य संमेलन 25 फेब्रुवारी 2021 रोजी तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयात होणार आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष, उद्योजक रामदास काकडे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

संमेलनाचे कार्याध्यक्ष बबनराव भेगडे, संघटक हरिश्चंद्र गडसिंग, मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे संमेलनाचे यशस्वी नियोजन करत आहेत, असे परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.