Pune Crime : रावणगाव ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक 

एमपीसी न्यूज – दौंड तालुक्यातील रावणगाव येथे 8 ते 9 सप्टेंबर दरम्यान अज्ञातांनी ट्रॅक्टर चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पुणे ग्रामीण एलसीबी शाखेने अटक केली असून त्यांच्या जवळील 6 लाख 80 हजार किंमतीचा ट्रॅक्टर जप्त केला आहे.

गणेश नंदकुमार भागवत (वय 25, रा.पाटस ता.दौंड, जि.पुणे) बाबासाहेब उर्फ भाऊ गाढवे (वय 27, रा.रावणगाव ता.दौंड जि.पुणे) मंगेश गाढवे वय 26, रा.रावणगाव ता.दौंड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावणगाव येथील ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ग्रामीण एलसीबी शाखेने त्यांना अटक केली.

तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला ट्रॅक्टर प्रवीण उर्फ भैय्या बबन हरणावळ (रा. श्रीराम सोसायटी, इंदापूर) या इसमाला विकल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 6 लाख 80 हजार किंमतीचा ट्रॅक्टर जप्त केला असून त्यांना दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.