Pune News : जोशी श्रीराम मंदिरात भाजपला सुबुद्धी देण्यासाठी रवींद्र धंगेकर यांची प्रार्थना

एमपीसी न्यूज : केंद्र सरकाराच्या अखत्यारीत (Pune News) येणार्‍या पुरातत्व विभागाच्या जाचक नियमामुळे पुणे शहरातील शनिवारवाडा परिसरातील 300 मीटर भागातील मिळकतींना बांधकाम करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून केंद्र सरकारने परवानगी द्यावी.

या मागणीसाठी शनिवारवाडा कृती समितीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जोशी श्रीराम मंदिरात आरती करून केंद्रातील भाजप सरकारला आमच्या भागातील मिळकतीचे प्रश्न सुटण्याची सुबुद्धी देवो अशी प्रार्थना यावेळी केली.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, शनिवारवाडा परिसरातील 300 मीटर परिसरात हजारो वाडे आणि इमारती आहेत. केंद्र सरकाराच्या अखत्यारीत येणार्‍या पुरातत्व विभागाने त्या सर्व मिळकतीना बांधकाम परवानगी द्यावी. या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 48 खासदारांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

तसेच आपल्या राज्यातील सर्व खासदार संसदेत प्रश्न मांडतील आणि मिळकतीचा प्रश्न मिटेल हीच अपेक्षा आहे. त्यासाठीच आज जोशी श्रीराम मंदिरात आरती करून केंद्रातील भाजप सरकारला आमच्या भागातील घरांचे प्रश्न सुटण्याची सुबुद्धी देवो हीच प्रार्थना केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, आमचा प्रश्न मार्गी लागेल. ही अपेक्षा आहे. मात्र  (Pune News) हा प्रश्न लवकरात लवकर सुटला नाही, तर आम्ही जनआंदोलन उभारू असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांमधील डिजिटल ॲडीक्शन कमी करण्यासाठी इनरव्हील क्लबचा उपक्रम

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.