Pune News : आरबीआयने घेतलेला निर्णय सर्व सहकार धोरणांच्या विरोधात -शरद पवार

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्यानंतर सहकार क्षेत्राचा विकास होण्यासाठी अनेक महत्वाची पावले उचचली होती. देशाला सहकार क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी स्वतंत्र्य मंत्रालय असावे, अशी मागणी बऱ्याच काळापासून होती. त्यानंतर मोदी मंत्रिमंडळात गृहमंत्री अमित शहा यांना पहिले सहकार मंत्रिपद देऊन ती मागणी प्रत्यक्षात उतरली. आता सहकारी बॅंकावर सदस्य नेमण्याचा अधिकार आरबीआयने स्वत: कडे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. 

आरबीआयने घेतलेला निर्णय सर्व सहकार धोरणांच्या विरोधात आहे, असे शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, सामान्य माणसाच्या दृष्टीनेही हा घातक प्रकार आहे. सहकारी बॅंका कुणाच्या हातात द्यायची हा सभासदांचा अधिकार आहे. कोण संचालक असावा, हे सभासद ठरवतात. ज्याची कामगिरी चांगली नसेल, त्याला पुढच्या निवडणुकीत बाजूला केले जाते. त्यामुळे सहकार क्षेत्र संपवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.